समाधान शिबिरात ज्ञानविकास विद्यालयाची तालुक्यात अव्वल कामगिरी

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) : ज्ञानविकास प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेण्यात आली. नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, क्रीडा स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, स्काऊट गाईड, कब - बुलबुल जिल्हा मेळावे, वाचन उपक्रम, सामाजिक उपक्रम तसेच दहावी आणि एन.एम.एम.एस. परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देऊन गौरविण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज महसूल महाराजस्व समाधान शिबिर नुकतेच पार पडले. या शिबिरात नायब तहसीलदार तुकाराम बनकर, बळीराम मुंडे मुंडे तसेच मंडळ अधिकारी आर. माने उपस्थित होते. नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेत त्यावर तत्काळ तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला, तर काही प्रकरणे पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आली. या प्रसंगी महसूल विभागाच्या वतीने सैनिक बांधवांसह गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. शाळेने वर्षभर शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करताना आवश्यक माहिती नियमितपणे सादर केली आहे. तसेच विविध उपक्रम, प्रशिक्षण आणि विद्यार्थी केंद्रित योजना यांची माहिती शिक्षण व क्रीडा विभागाच्या संकेतस्थळावर वेळोवेळी अद्ययावत ठेवण्यात आली. या सर्व बाबींच्या आधारे शाळेची गुणवत्ता तपासणी करण्यात आली.

या मूल्यांकनात ज्ञानविकास प्राथमिक शाळा, भराडी हिने (शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा) अंतर्गत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. या यशाबद्दल महसूल विभागाने शाळेच्या शिक्षकांचा सन्मान करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी, यावेळी जिल्हा परिषद सदस्य राधाकृष्ण काकडे, पंचायत समिती सदस्य नारायण खोमणे, माजी उपसरपंच अनिस पठाण, नायब तहसीलदार तुकाराम मुंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू घोडे, बळीराम मुंडे, यतीन
कुलकर्णी, माजी सरपंच रघुनाथ पांडव, आरेफ पठाण, लक्ष्मण जगताप, रवी काळे, अशोक सुरडकर, प्रकाश महाजन, संजय राकडे, यायाखान पठाण, पंढरीनाथ पाटील, सुरेश साळवे, मारुती वराडे, रहाटे, रफिक पठाण, अजीम पठाण, दीपक सोनवणे, काशीनाथ ताठे, सोमीनाथ गोरे, साहेबराव खोमणे, आसेफ पठाण, कल्याणकर, रुक्मिणी माने, आप्पासाहेब सोनवणे, श्रीमती गरुड सुनीता, सूरज लांडकर, पोपट तायडे, उषा गुप्ता, रवींद्र साळवे, जगन काकडे, अनिल सोनवणे, संदीप खोमणे, शिवाजी सोनवणे, बाबा पठाण, राम सरोदे आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन दीपक सोनवणे, रायभान जाधव यांनी केले.